बुधवार, 27 दिसंबर 2017

👉पाणी पिण्याची योग्य वेळ व फायदे

👉पाणी पिण्याची योग्य वेळ





● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर -
शरीरातील उर्जेला Activate
करतो.

● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -
ब्लड प्रेशर त्रास संपवतो.

● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -
पचनक्रिया सुधारतो.

● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -
हार्ट अटैक पासुन वाचवतो.

चांगला मैसेज आहे.
जरुर फॉरवर्ड करा..


🌴🍃🌴🍃 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦

जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....




       जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....

१)जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत 
  रहा.
२)प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.
३)दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांना अधिक प्रमाणात
    ऑक्सिजन मिळतो.

अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. 

कृपया जास्तीत जास्तलोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राणवाचू शकतात......करा फॉरवर्ड होऊ दे खर्च  जरा चांगल्या कामासाठी


 plz share 📲📲
कुणाच तरी जीव वाचेल

सोमवार, 25 दिसंबर 2017

👉 ख्रिसमस का साजरा करतात? कोण आहे नाताळबाबा?


25 डिसेंबर रोजी प्रभू येशुंच्या जन्मदिवस म्हणून ख्रिश्चन समुदाय ख्रिसमस सण साजरा करतात.  आनंद आणि उत्साहाचे प्रतिक असलेला हा सर्वात मोठा सण आहे. ख्रिसमस ट्री सजवणे, सांताचे गिफ्ट आणि कार्ड पाठवणे अशा प्रमुख गोष्टीने हा सण साजरा केला जातो. आपल्याला बऱ्यापैकी हा सण का साजरा करतात याविषयी माहिती नसते म्हणूनच कोण आहेत सांता क्लॉज, का सजवतात ख्रिसमस ट्री? याविषयी जाणून घेणार आहोत.





🎅सांता क्लॉज


सध्याच्या युगात सांता क्लॉज खिसमसचा प्रमुख घटक आहे. दीडहजार वर्षांपूर्वी जन्मलेले संत निकोलस यांना खरा सांता आणि सांताचे जनक मानले जाते. यांच्याशिवाय ख्रिसमस अपूर्ण मानला जातो.


कोण होते नाताळबाबा?



संत निकोलस (नाताळबाबा) यांचा जन्म तिसऱ्या शतकात येशुनंतर 280 वर्षांनंतर एका श्रीमंत कुटुंबात पटारा येथे झाला. प्रभू येशुंवर त्यांची लहानपणापासूनच नितांत श्रद्धा होती. मोठे झाल्यानंतर ते ख्रिश्चन धर्माचे पादरी (पुजारी) आणि नंतर बिशप बनले. ते लहान मुलांना आणि गरिबांना नेहमी गिफ्ट देत होते. संत निकोलस नेहमी गिफ्ट मध्यरात्रीच देत असत कारण ते स्वतःची ओळख जगासमोर आणू इच्छित नव्हते.



ख्रिसमस ट्री का सजवतात?🎋🎄🎊




महापुरुष येशुंचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या देवतांनी सदाबहार वृक्षाला तारे, चांदण्यांनी सजवले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी या सदाबहार वृक्षाला 'ख्रिसमस ट्री' प्रतिक स्वरुपात सजवले जाते. या झाडाला सजवण्याची प्रथा जर्मनीत दहाव्या शतकापासून सुरु झाली आणि याची सुरुवात करणारा पहिला व्यक्ती बोनिफेंस टुयो नावाचा एक इंग्रज धर्मप्रचारक होता.



ख्रिसमस कार्डची प्रथा कशी सुरु झाली?🎟


ख्रिसमसच्या दिवशी सर हेन्री कोले यांनी 1843 मध्ये सर्वात पहिले ख्रिसमस कार्ड पाठवले. त्यामुळे याला पहिले ख्रिसमस कार्ड मानले गेले. या कार्डवर एका शाही कुटुंबाचे तीन पिढ्यांचे फोटो होते. तसेच गोर गरिबांना मदत केल्याचे देखील फोटो होते. सोबतच ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ख्रिसमस कार्डची सुरुवात झाली.



🎅🎅 ख्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा, मेरी  ख्रिसमस...!🎅🎅


आवडलं तर नक्की share करा आणि like करा🙏

रविवार, 24 दिसंबर 2017

👉 तुमचे केस पांढरे झालेत का? मग वाचा या टिप्स...

👉 तुमचे केस पांढरे झालेत का? मग वाचा या टिप्स...

आजच्या धावपळीच्या युगात केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीरासाठी आवश्यक असणार्‍या पोषक घटकांची कमतरता, एखादा जुना आजार किंवा काहीवेळा औषधे यांच्यामुळेही केस पांढरे होतात. केस पांढरे झाले की अनेक जण मेहंदी लावणे हा त्यावरील उपाय समजतात मात्र नैसर्गिक उपायांनीही तुमचे केस पांढरे होणे थांबवता येऊ शकते. ते कसे त्याबद्दल खास टिप्स...!




👉 मेथीचे दाणे :

 मेथीच्या दाण्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस पांढरे होणे कमी होते. पिण्याच्या पाण्यामध्ये थोडे मेथीचे दाणे टाकून हे पाणी गरम करा आणि रोज एक ग्लास हे पाणी प्या. मेथीचे दाणे आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट डोक्याला लावा.


👉 चहा आणि कॉफी: 

चहा आणि कॉफी दोन्हींमध्ये केस रंगवण्याची व अधिक तपकिरी करण्याची क्षमता  आहे. मात्र त्यासाठी चहा व कॉफीचे मिश्रण दाट असणे आवश्यक आहे. यासाठी चहा पावडर किंवा टी बॅग्सचा वापर करा. व ते गरम पाण्यात मिक्स करून केसांना लावा.

👉 आवळा : 

केस पांढरे होणे थांबवण्यासाठी आवळा मदत करतो. यामुळेच तेल आणि शाम्पूमध्येही आवळ्याचा वापर केला जातो. नारळाच्या तेलामध्ये आवळ्याचे तुकडे टाका, या तुकड्यांना काळा रंग येईपर्यंत ते मिश्रण गरम करा आणि डोक्याला लावा. याबरोबरच आवळ्याचा रस पिला तरीही केस पांढरे होणे कमी होते.


👉 तिळाचे दाणे : 

तिळाचे दाणे बदामाच्या तेलात टाकून हे मिश्रण डोक्याला लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा, यामुळे तुमचे केस पांढरे व्हायचे प्रमाण कमी होईल.


👉 कांदा:

 गळणारे आणि पिकणारे केस थांबवण्यासाठी कांदा हा उपाय आहे. कांद्यामध्ये कॅटालेस एंजाईम मोठ्या प्रमाणावर असते. केस पांढरे होत असतील तर अर्धा कांदा घेऊन तो डोक्यावर चोळा किंवा कांद्याचा रस डोक्याला लावा आणि एका तासानंतर शाम्पूने केस धुवा.


👉 मेहंदी : 

केस पांढरे होणं थांबवण्यासाठी डोक्याला मेहंदी लावा. मेहंदी लावताना बनवण्यात येणाऱ्या मिश्रणामध्ये एरंडाचे तेल आणि लिंबाचा रस टाका आणि एक तासापर्यंत हे मिश्रण तसेच ठेवून मग ते डोक्याला लावा.

आवडल्यास नक्की share👍 करा व आमच्या fb पजेला पण जरूर like 😊 करा

बुधवार, 13 दिसंबर 2017

👉 कोल्हापूर येथे शासकीय रोजगार मेळावा

👉 कोल्हापूर येथे शासकीय रोजगार मेळावा





पोस्ट : अकाउंटंट - जागा : 05

पोस्ट : ITI (फिटर/टर्नर) - जागा : 20

पोस्ट : ITI (मशीनिस्ट) - जागा : 10

पोस्ट : CNC /VMC - जागा : 30

पोस्ट : हेल्पर्स - जागा : 15

पोस्ट : बॅक ऑफिस - जागा : 35

पोस्ट : हेल्पर/ऑपरेटर - जागा : 20

पोस्ट : सेल्स एक्झिक्युटिव - जागा : 35

पोस्ट : ITI इलेक्ट्रिशियन/फिटर - जागा : 15

पोस्ट : सेल्स एक्झिक्युटिव - जागा : 05

पोस्ट : सपोर्ट एक्झिक्युटिव - जागा : 03

पोस्ट : सपोर्ट एक्झिक्युटिव - जागा : 03

पोस्ट : मार्केटिंग एक्झिक्युटिव - जागा : 04

पोस्ट : प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर टेलिकॉलर - जागा : 10

पोस्ट : बिज़नेस डेवलपमेंट - जागा : 05

पोस्ट : मार्केटिंग मॅनेजर / एक्झिक्युटिव - जागा : 25

पोस्ट : ITI CNC /VMC - जागा : 05

पोस्ट : सेल्स ऑफिसर - जागा : 40

पोस्ट : सीनिअर अकाउंटंट - जागा : 02

पोस्ट : मार्केटिंग ऑफिसर - जागा : 03

पोस्ट : सुपरवायजर - जागा : 03

पोस्ट : टेलिकॉलर - जागा : 05

पोस्ट : फिल्ड ऑफिसर - जागा : 02

पोस्ट : ऑफिसबॉय - जागा : 01

पोस्ट : प्रमोटर - जागा : 01

पोस्ट : ITI Modular/Pouring Opr. - जागा : 06

पोस्ट : ITI Furness Opr /स्प्रे पेंटर - जागा : 07

पोस्ट : ITI वेल्डर & प्लंबर - जागा : 02

पोस्ट : सफाई कामगार - जागा : 02

नोकरी ठिकाण : कोल्हापूर

मेळाव्याची तारीख : दि. 17 डिसेंबर 2017

मेळाव्याचे ठिकाण : मेन राजाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय जुना राजवाडा, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/n1fu4Q

ऑनलाईन नोंदणीसाठी : https://goo.gl/WhnVEo


मंगलवार, 12 दिसंबर 2017

👉 फेसबुकचे नवीन ‘ग्रीटिंग्ज फिचर’

👉 फेसबुकचे नवीन ‘ग्रीटिंग्ज फिचर’





फेसबुकवर लवकरच नवीन फिचर येणार असून ‘ग्रीटिंग्ज फिचर’असे या नव्या फिचरचे नाव आहे. फेसबुकच्या या ग्रीटिंग फिचरद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेगळ्या पद्धतीने चॅट करू शकणार आहात. या नवीन फिचरमधून तुम्ही पोक, विंक किंवा हाय-फाय हेही पर्याय उपलब्ध होणार आहेत. सध्या या फिचरची चाचणी ब्रिटन, थायलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया आणि फ्रान्स येथे सुरू असून लवकरच ते जगभरात लाँच होणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

👉 तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?

👉 तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?




                बँक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड वापरले जात असल्याने त्याची खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच तुमचे आधार कार्ड कुठे वापरले तर जात नाही ना, याची पडताळणी करणे महत्वाचे ठरते. आता uidai ने हि सुविधा आधारधारकांना दिली असून वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधारचा वापर कुठे होतोय हे चेक करू शकता.


1) सर्वात आधी https://resident.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

2) या संकेतस्थळावर Aadhaar Authentication History वर क्लिक करा.

3) यानंतर OTP जनरेट करा, तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP नंबर येईल.

4) OTP नंबर टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळतील. त्यानंतर निश्चित वेळेत तुम्हला तो टाकावा लागेल.

5) तुमच्या आधार नंबरच्या डिटेल्सवरून तो कधी कधी वापरला गेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये जर काही गडबड असेल तर तुम्ही तक्रार करू शकता.

6) जर खरच तुमच्या आधारचा गैरवापर होत असेल तर तुम्ही आधार ऑनलाइन लॉक करू शकता.

👉2023 चा वर्ल्डकप भारतात रंगणार

👉2023 चा वर्ल्डकप भारतात रंगणार


2023 चा वनडे वर्ल्डकप आणि 2021 ची चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या मानाच्या स्पर्धांचे यजमानपद भारताकडे असणार आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारताने याआधी 1987, 1996 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्डकपचे यजमानपद भूषविले आहे. 

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकपच्या यजमानपदासह भातीय संघ अफगाणिस्तानच्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपदही भूषविणार आहे. 2019-2020मध्ये हा सामना भारतात होईल. सोबतच या बैठकीत 2019 ते 2023 पर्यंतचा भारतीय संघाचा कार्यक्रमही जाहीर झाला. या पाच वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर 306 दिवसात 81 सामने खेळणार आहे.

सोमवार, 11 दिसंबर 2017

👉150 शेतकरी कुटुंबाला करोडपती बनविणारा अवलिया

👉 सतीश मगर ; 150 शेतकरी कुटुंबाला करोडपती बनविणारा अवलिया



पुण्यातील मगरपट्टा सिटीबद्दल कोणी ऐकलं नसेल तर नवलच. अशा या मगरपट्टा सिटीला पुण्याचं नवीन आकर्षण म्हंटल तर काही वावगं ठरणार नाही. रजनीकांतला सुद्धा याची भुरळ पडली आणि शिवाजी द बॉस या चित्रपटाचे काही शूटिंग मगरपट्टा सिटीत चित्रित केले.

अशी हि प्रसिद्ध टाऊनशिप कोणत्या व्यावसायिकाची असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल मात्र या सिटीचे वैशिट्ये म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकाची हि टाऊनशिप नसून पिढ्यानपिढ्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मिळून हि सिटी बांधली आहे. मात्र या निर्मितीमागे सतीश मगर यांचे संस्थापक म्हणून नक्कीच नाव घेता येईल.


👉 सतीश मगर हे एका शेतकरी जमीनदार घराण्यातुन आले आहेत. अत्यंत साधेपणा हा त्यांचा महत्वाचा गुणधर्म आहे.

👉 शालेय शिक्षण पूर्ण झाल्यांनतर सतीश मगर यांनी कृषी महाविद्यालयातून पदवी घेतली. त्यांची पदवी पूर्ण झाल्यानंतर ते शेतीकडे वळले.

👉 त्याच कालावधीमध्ये मगरपट्टा परिसरातील शेतकरी आपल्या जमिनी बिल्डरला विकत होते त्यातून आलेल्या पैशातून उधळपट्टी करून शेवटी कंगालीच्या वाटेवर यायचे.

👉 काहीतरी वेगळे केले पाहिजे हा त्यांच्यामध्ये विचार होता. त्यांना अगोदर वाटले कि आपण आपल्या जमिनीवर बंगले बांधून विकावेत पण त्यांना ते व्यावसायिक वाटले नाही.

👉 काही वर्ष शेती केली असल्याने त्यांचे परिसरातील सर्व शेतकऱ्यांशी संबध होते. सर्व शेतकऱ्यांना एकत्र घेऊन एक कंपनी स्थापून ज्यांची जेवढी शेती त्या प्रमाणात त्यांना कंपनीमध्ये भागीदारी देण्याचा त्यांचा विचार त्यांनी मांडला.

👉 या विचाराला बऱ्याच शेतकऱ्यांनी सहमती दिली. तसा या गोष्टीला विरोध हि करण्यात आला. पण सर्वांना व्यवस्थित समजावून भविष्यातील फायदे दाखवून देऊन तयार केले व मगरपट्टा टाऊनशिपची पायाभरणी सुरु झाली.

👉 सर्व प्लॅन काढून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. पवारांनी त्यांना विचारले कि आपण टाऊनशिप उभी करण्याबाबत गंभीर आहात का? हो म्हटल्यावर त्यांनी शहरी जमीन कमाल मर्यादा कायद्याबाबत विचारले व उत्तर दिल्यानंतर त्यांनी फाईलवर साइन केली व पुढे पाठवली.

👉 2000 साली मगरपट्टा टाऊनशिपच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. पहिल्यांदा त्यांनी आय टी पार्क बांधणे सुरु केले त्यावेळी आयटी पार्क हा एक आकर्षणाचा मुद्दा होता.

👉 सुमारे 430 एकर मध्ये हि टाऊनशिप आहे. यामधील सायबरसिटी पूर्णपणे कंपनीच्या मालकीची आहे त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग मगरपट्टा सिटीच्या देखरेखीसाठी खर्च केला जातो.

👉 यासोबतच अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी उद्योगासाठी प्रेरणा दिली. यातून अनेकजण आज उद्योजक झाले आहेत.

👉 सतीश मगर यांनी स्वतः पुरता विचार न करता सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विचार केला व देशातील एक सुंदर शहर वसवले. यासोबतच त्या शहरातील 30 टक्के मालकी कायमस्वरूपी शेतकऱ्यांना देऊन अनेक पिढयांसाठी त्यांनी आदर्श निर्माण केला.

👉 पुणे जिल्हा ग्रामीण विकास संस्थेत भरती

👉 पुणे जिल्हा ग्रामीण विकास संस्थेत भरती



पोस्ट : गट समन्वयक - जागा : 12 - पात्रता : BSW/MSW/MBA/ग्रामीण विकास PG डिप्लोमा, 01 वर्ष अनुभव

वय : दि. 30 नोव्हेंबर 2017 रोजी 38 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Maharashtra State Rural Livelihoods Mission, District Rural Development Agency (DRDA), Pune

अर्ज करण्याची मुदत : दि. 20 डिसेंबर 2017

अधिकृत वेबसाईट : https://goo.gl/3JozC2

अधिक माहितीसाठी व अर्जासाठी : https://goo.gl/MqdFAU

👉 दिल्ली पोलीस दलात ‘मल्टी टास्कींग स्टाफ’ पदांची भरती

👉 दिल्ली पोलीस दलात ‘मल्टी टास्कींग स्टाफ’ पदांची भरती




पोस्ट : कुक - जागा : 253

पोस्ट : पाणीवाहक - जागा : 54

पोस्ट : सफाई कर्मचारी - जागा : 237

पोस्ट : मोची - जागा : 14

पोस्ट : धोबी (वॉशर मॅन) - जागा : 68

पोस्ट : शिंपी - जागा : 16

पोस्ट : दफ्तरी - जागा : 03

पोस्ट : माळी - जागा : 16

पोस्ट : न्हावी - जागा : 39

पोस्ट : कारपेंटर - जागा : 01

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमध्ये ITI

वय : जन्म दि. 16 जानेवारी 2018 रोजी 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण : दिल्ली

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 16 जानेवारी 2018

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/h5BcWu

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/BjLTZ1


रविवार, 10 दिसंबर 2017

👉 देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

👉 देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती




पोस्ट : कनिष्ठ अभियंता स्थापत्य - जागा : 03 - पात्रता : सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Tech

पोस्ट : लघुलेखक - जागा : 01 - पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 50 श.प्र.मि.

पोस्ट : हिंदी अनुवादक - जागा : 01 - पात्रता : इंग्रजी / हिंदी विषयासह पदव्युत्तर पदवी

पोस्ट : स्वच्छता निरीक्षक - जागा : 01 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा, 03 वर्षे अनुभव

पोस्ट : कनिष्ठ लिपिक - जागा : 09 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. हिंदी/मराठी टायपिंग 25 श.प्र.मि.

पोस्ट : मेसन - जागा : 02 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI

पोस्ट : कारपेंटर - जागा : 01 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI

पोस्ट : प्लंबर - जागा : 02 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI

पोस्ट : मजूर - जागा : 06 - पात्रता : 07 वी उत्तीर्ण

पोस्ट : व्हॉल्व मॅन - जागा : 01 - पात्रता : 07 वी उत्तीर्ण

वय : 10 डिसेंबर 2017 रोजी 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण :  देहू रोड, पुणे

लेखी परीक्षा/मुलाखत : दि. 10 डिसेंबर 2017

मुलाखतीचे ठिकाण :  महात्मा गांधी प्राथमिक शाळा, एम.बी. कॅम्प (बँक ऑफ इंडिया जवळ), देहू रोड, पुणे 412101

अधिकृत वेबसाईट : https://goo.gl/7YAyrT

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/sCntxL

अँप्लिकेशन फॉर्मसाठी : https://goo.gl/twicj1


👉महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती

👉 महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती




पोस्ट : सुरक्षा रक्षक (पुरुष) - जागा : 1000 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता : उंची - 170 सेमी I वजन - 60KG I छाती - 79 सेमी व फुगवून 5 सेमी जास्त

वय : दि. 01 डिसेंबर 2017  रोजी 18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

फी : 200 रुपये  

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 20 डिसेंबर 2017

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/A7qwpa

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/MkFk4t

शनिवार, 9 दिसंबर 2017

👉 तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?

👉 तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?



तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोबाईल आपल्या हाती आला खरा पण त्यावर आपण बरंच अवलंबून राहू लागलोय. इतंकच नाही तर बऱ्याच अंशी आपण मोबाईलच्या आहारी जात असल्याचंही समोर येतंय. त्यामुळे आता एका मोबाईल कंपनीनेच याबाबत एक आगळीवेगळी मोहीम सुरु केली आहे. 

मोटोरोला या मोबाईल कंपनीने #phonelifebalance ही मोहीम सुरु केली आहे. याद्वारे त्यांनी यूजर्सला एक प्रकारे सावध करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 'तुम्ही मोबाईलचे मालक आहात, मोबाईल तुमचा मालक नाही.' या टॅगलाईनखाली  मोटोरोलाने #phonelifebalance ही मोहीम सोशल मीडियावर सुरु केली आहे.





आजघडीला चार लोकं एकत्र आल्यानंतरही जवळजवळ प्रत्येकजण हा फोनमध्येच बिझी असतो. या गोष्टीचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. हे ओळखून मोटोरोलाने हे नवे पाऊल उचलले आहे. वारंवार फोन चेक करणे, सतत फोन आपल्या हातात असणे ही फोनच्या आहारी जाण्याची लक्षणे आहेत.

मात्र आपण फोनच्या आहारी गेलो आहात की नाही? हे तपासण्यासाठी मोटोरोलाने एक खास 'क्विझही' (प्रश्नावली) आणले आहे. यामध्ये यूजर्ससाठी फोन वापरासंबंधी काही वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्ही फोनच्या किती आहारी गेले आहात याचे उत्तर तुम्हाला तात्काळ मिळेल. यासाठी वेगवेगळ्या लेव्हल देण्यात आल्या आहेत. तुम्ही जर पाचव्या लेव्हलपर्यंत पोहोचलात तर तुम्ही फोनच्या प्रचंड आहारी गेला आहात एवढं निश्चित.

_चला तर मग चेक करा तुम्ही फोनच्या आहारी गेला आहात की नाही?...
 त्यासाठी क्लिक करा 
https://goo.gl/s9qYMn


Source:-Letsup magazine.

👉अहमदनगर येथे शासकीय रोजगार मेळावा

👉 _*अहमदनगर येथे शासकीय रोजगार मेळावा*_


पोस्ट : ट्रेनी मॅनेजर (पुरुष/महिला) - जागा : 10 - पात्रता : पदवीधर

पोस्ट : ट्रेनी क्लर्क (पुरुष/महिला) - जागा : 10 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी शिपाई (पुरुष/महिला) - जागा : 10 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी कमिशन एजंट (पुरुष/महिला) - जागा : 30 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी सेल्समन (पुरुष/महिला) - जागा : 40 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी प्रेस ऑपरेटर (पुरुष) - जागा : 10 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण


पोस्ट : ट्रेनी जॉब इंस्पेक्टर (पुरुष) - जागा : 04 - पात्रता : ITI (इलेक्ट्रिशियन)

पोस्ट : ट्रेनी लेडीज असेम्बलर (महिला) - जागा : 25 - पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी सीक्युरिटी (पुरुष) - जागा : 05 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी ड्राइव्हर (पुरुष) - जागा : 02 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, वाहन चालक परवाना

पोस्ट : ट्रेनी मॅनेजींग प्रोडक्शन क्वालिटी - जागा : 04 - पात्रता : BE/DME

पोस्ट : ट्रेनी हेल्थ इन्शुरन्स सल्लागार (पुरुष/महिला) - जागा : 20 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी हेल्थ इन्शुरन्स सल्लागार (पुरुष/महिला) - जागा : 20 - पात्रता : पदवीधर

पोस्ट : EPP ट्रेनी (पुरुष/महिला) - जागा : 30 - पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण

पोस्ट : EPP ट्रेनी (पुरुष/महिला) - जागा : 20 - पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी कोरोगेशन ऑपरेटर - जागा : 05 - पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण

पोस्ट : ट्रेनी रोटरी ऑपरेटर - जागा : 05 - पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण : अहमदनगर

मुलाखत : दि. 14 डिसेंबर 2017

मुलाखतीचे ठिकाण : रावसाहेब पटवर्धन स्मारक समिती सभागृह, समर्थ शाळेसमोर, मिस्तबाग रोड, अहमदनगर

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/gPH3NA

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/PLRYN4

👉 भारतीय क्रिकेट संघ; आगामी 9 महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक!

👉 भारतीय क्रिकेट संघ; आगामी 9 महिन्यांचं संपूर्ण वेळापत्रक!




आगामी 9 महिन्यात भारतीय क्रिकेट संघ मोठ्या प्रमाणावर क्रिकेट खेळणार आहे. त्यात श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडसोबतच्या दौऱ्यांचा समावेश आहे. याचे सविस्तर वेळापत्रक जाणून घेऊयात....

👉 श्रीलंका-भारत दौरा खालीलप्रमाणे :


वनडे मालिका :

* 10 डिसेंबर - पहिला वन-डे सामना (धर्मशाला)

* 13 डिसेंबर - दुसरा वन-डे सामना (मोहाली)

* 17 डिसेंबर - तिसरा वन-डे सामना (विशाखापट्टणम)

टी-20 मालिका :

* 20 डिसेंबर - पहिली टी-20 (कटक)

* 22 डिसेंबर - दुसरी टी-20 (इंदौर)

* 24 डिसेंबर - तिसरी टी-20 (मुंबई)




👉 भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा खालीलप्रमाणे :

कसोटी मालिका :

* 30 ते 31 डिसेंबर - सराव सामना (केप टाऊन)

* 05 ते 09 जानेवारी - पहिली कसोटी (केप टाऊन)

* 13 ते 17 जानेवारी - दुसरी कसोटी (सेंच्युरियन)

* 24 ते 28 जानेवारी - तिसरी कसोटी (जोहान्सबर्ग)

वनडे मालिका :

* 01 फेब्रुवारी - पहिला वन-डे सामना (किंग्समेड  : दिवस-रात्र)

* 04 फेब्रुवारी - दुसरा वन-डे सामना (सेंच्युरियन : दिवस)

* 07 फेब्रुवारी - तिसरा वन-डे सामना (केप टाऊन : दिवस-रात्र)

* 10 फेब्रुवारी - चौथा वन-डे सामना (जोहान्सबर्ग : दिवस-रात्र)

* 13 फेब्रुवारी - पाचवा वन-डे सामना (पोर्ट एलिजाबेथ : दिवस-रात्र)

* 16 फेब्रुवारी । सहावा वन-डे सामना (सेंच्युरियन दिवस-रात्र)

टी-20 मालिका :

* 18 फेब्रुवारी । पहिला टी-20 सामना । जोहान्सबर्ग (दिवस)

* 21 फेब्रुवारी । दुसरा टी-20 सामना । सेंच्युरियन (दिवस-रात्र)

* 24 फेब्रुवारी । तिसरा टी-20 सामना । केप टाऊन (दिवस-रात्र)



👉 भारताच्या इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे :




टी-20 मालिका:

* 03 जुलै - पहिली टी-20 (ओल्ड ट्रॅफिओर्ड)

* 06 जुलै - दुसरी टी-20 (कार्डिफ)

* 08 जुलै - तिसरी टी-20 (ब्रिस्टॉल)

वनडे मालिका :

* 12 जुलै - पहिली वनडे (ट्रेंट ब्रिज)

* 14 जुलै - दुसरी वनडे (लॉर्ड्स)

* 17 जुलै - तिसरी वनडे (हेडींगले)

कसोटी मालिका :

* 01 ते 05 ऑगस्ट - पहिली कसोटी (एडगबास्टोन)

* 09 ते 13 ऑगस्ट - दुसरी कसोटी (लॉर्ड्स)

* 18 ते 22 ऑगस्ट - तिसरी कसोटी (ट्रेंट ब्रिज)

* 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर - चौथी कसोटी (अगेस बॉवेल)

* 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर - पाचवी कसोटी (किवा ओव्हल)

👉 मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरीची संधी

👉 _*मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरीची संधी*_



पोस्ट : फिटर - जागा : 15

पोस्ट : मशिनिस्ट - जागा : 10

पोस्ट : पोस्ट : शीट मेटल वर्कर - जागा : 15

वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) - जागा : 15

पोस्ट : प्लंबर - जागा : 10

पोस्ट : मेसन (BC) - जागा : 10

पोस्ट : मेकॅनिक मशीन टूल मेन्टेनन्स - जागा : 05

पोस्ट : मेकॅनिक Ref. & AC - जागा : 05

पोस्ट : मेकॅनिक डिझेल - जागा : 15

पोस्ट : टेलर (जनरल) - जागा : 05

पोस्ट : पेंटर (जनरल) - जागा : 10

पोस्ट : पॉवर इलेक्ट्रिशियन - जागा : 20

*दोन वर्षांचे प्रशिक्षण*

पोस्ट : शिपराइट (स्टील) - जागा : 10

पोस्ट : पाईप फिटर - जागा : 10

पोस्ट : रीगर - जागा : 05

पोस्ट : शिपराईट (वूड) - जागा : 15

पोस्ट : क्रेन ऑपरेटर - जागा : 05

शैक्षणिक पात्रता : 08वी/10वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI

वय : जन्म दि. 01 एप्रिल 1997 ते 31 मार्च 2004 दरम्यान.

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 29 डिसेंबर 2017

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/qpfZxc

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/fvNTEz


शुक्रवार, 8 दिसंबर 2017

👉 असा असावा थंडीतला आहार*


👉 असा असावा थंडीतला आहार





आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्याचा मोसम म्हणजे आल्हादायक काळ असतो. यामुळेच हा काळ आरोग्य कमावण्यासाठी योग्य मानला जातो. कारण या दिवसात भाज्या, फळेही भरपूर आलेली असतात. म्हनुनच हिवाळ्यात आरोग्यदायी आहार नेमका कसा घ्यावा त्यावर एक नजर...

👉 हिवाळ्यात दुध, तुप, लोणी यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता, कॅलरीज असतात. त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते.



👉 मांसाहारी व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये आहारात मटण, मांस, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करावा.


👉 आहारामध्ये तीळ, लसून, मिरी, मोहरी, लवंग, जीरे, आले, हिंग, तमालपत्र इ. मसाला वापरावा. त्यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे लसणाची, तिळाची चटणी करावी.


👉 बदाम, काजू, मणूका, अक्रोड इ. सुका मेव्यामध्ये स्निग्ध उष्ण गुणधर्म असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.



👉 गहू, ज्वारी, बाजरी ह्या धान्यांपासून बनवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. भाकरी बरोबर लोणी किंवा तुप खावे.

👉 हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्यांचाही हिवाळ्यामध्ये आहारात भरपूर समावेश करावा.




👉 या दिवसांत कोमट पाणी प्यावे. त्यामुळे आहाराचे पचन योग्य प्रकारे होण्यास मदत होते.


👉 थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतातच पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होते. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते.



👉 थंडीच्या दिवसात ग्रीन टीचे सेवन उपयुक्त ठरते. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटी अॅक्सिडंट्स असतात. यामुळे अनेक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो.



👉 संत्री, द्राक्ष अशा फळांमध्ये क जीवनसत्त्व असतात. यामुळे त्वचेचे पोषण होते. कोलेस्टरॉल कमी करण्यासोबतच ही फळं चयापचय क्रिया ही वाढवतात.


👉 हिवाळ्यात मधाचा वापर आरोग्याला विशेष लाभदायक ठरतो. तसेच मोड आलेल्या कडधान्यांचाही आहारात समावेश करा.



Source:-Lets up magazine

बुधवार, 6 दिसंबर 2017

👉 कॉन्टॅक्ट लेन्स आणि काळजी...

👉 कॉन्टॅक्ट लेन्स आणि काळजी...



बऱ्याच जणांना डोळ्यावर चष्मा लावायला नको-नको वाटतं. कशाला ओझं असं वाटायला लागतं. मग अशा लोकांसाठी कॉन्टॅक्ट लेन्सचा पर्याय समोर असतो. यामुळे अनेक जण कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात, पण त्यांची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. लेन्सेस कशी घालायची? त्यांची स्वच्छता कशी ठेवायची? याची माहिती तज्ञांकडून घेतली पाहिजे. डोळे तपासून लेन्सेसची खरोखरंच गरज आहे का? हेही जाणून घेतले पाहिजे. म्हणूनच आज याबाबत काही बाबींवर नजर टाकूयात...


1) बहुदा झोपताना आपले डोळे कोरडे होतात. तसेच डोळ्यांना होणारा ऑक्सिजन पुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळयांत लेन्स असताना झोपू नका. असे केल्यास डोळ्यांना कॉर्नियाचा संसर्ग होतो. त्यामुळे दृष्टी देखील जावू शकते.

2) जेव्हा डोळयांत लेन्स घालायची असेल तेव्हा हात स्वच्छ धुऊन घ्यावेत. लेन्स सोल्युशन्ससह हाताच्या तळव्यावर घेऊन स्वच्छ बोटांनी हळुवारपणे साफ केली पाहिजे.

3) जर शक्य असेल तर दररोज किंवा दर दोन दिवसांनी लेन्स केसमधील सोल्युशन बदलले पाहिजे. तसेच दर महिन्याला सोल्युशनची बाटली बदलली पाहिजे.

4) दर महिन्याला लेन्स केस बदला. वार्षिक किंवा सहामाही वापरण्यात येणाऱ्या लेन्सेसपेक्षा मासिक डिस्पोजेबल लेन्सेसचा वापर करा.

5) पोहताना कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर केल्यास स्युडोमोनास जिवाणू किंवा एसेन्थ अमिबा परजिवीची निर्मिती होते; त्यामुळे डोळ्यांना वेदना होतात. असे झाल्यास लगेच कॉर्निया स्पेशालिस्टकडे जाऊन डोळ्यांमध्ये ऑण्टिबायोटिक थेंब टाकण्याची गरज असते. कॉर्नियल अल्सर या डोळ्यांच्या बाहेरील पारदर्शक भागाला होणारा संसर्ग आहे. त्यामुळे दृष्टी गमावण्याचा धोका देखील असतो.

मंगलवार, 5 दिसंबर 2017

👉 अंगावर चामखीळ आहे? फिकर नॉट ‘अशी करा नाहीशी

👉 अंगावर चामखीळ आहे? फिकर नॉट ‘अशी करा नाहीशी



चामखीळ हा प्रकार आपल्या सर्वांना माहिती आहे. त्वचेच्या पृष्ठभागावर वाढलेले लहान व खडबडीत अर्बुद म्हणजे चामखीळ. आपण त्याला ‘मोस’ असेही म्हणतो. स्कीन ट्यूमरच्या नावाने देखील हा ओळखला जातो. शरीरातील ह्यूमन पापिल्लोमा व्हायरसमुळे अंगावर मोस येतात. जे शरिरासाठी धोकादायक नसतात पण शरिराची सुंदरता खराब करतात.
चामखीळ नाहीशी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे प्रयोग करतात. काहींना यश येत तर काहींना अपयश. मात्र अनेकदा प्रयोग महागात पडतात व त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात. म्हणूनच चामखीळ कशी नाहीशी करायची याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

👉 लिंबाचा रस

लिंबाचा रस चामखीळच्या जागेवर लावल्याने याची समस्या दूर होते. कापसाने लिंबूचा रस चामखिळीवर लावा आणि त्यावर कापूस तसाच ठेवून द्या.


👉 बटाट्याचा रस



बटाट्याचा रस किंवा बटाटा बारीक करुन चामखीळच्या जागी लावल्याने चामखीळ हळूहळू कमी होण्यास मदत होते.


👉 अननसाचा रस:


चामखीळपासून सुटका मिळण्यासाठी तुम्ही अननस रस, फ्लॉवर रस, कांद्याचा रस आणि मध वापरु शकता. कारण या सगळ्यांमध्ये चामखीळला नाहीसा करण्यासाठीचे एन्जाईम्स असतात.


👉 लसूण
                
लसणाचे सेवन अनेक समस्यांपासून लांब राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. सुंदरतेसाठी देखील लसूण तेवढाच फायदेशीर आहे. लसणाच्या पाकळ्या चामखीळवर घासा किंवा त्याची पेस्ट लावा. असे केल्यास काही दिवसात तुम्हाला फरक जाणवेल.


👉 सफरचंदाचे व्हिनेगर:


चामखीळच्या समस्या मुळापासून नाहीशी करण्यासाठी हा अधिक फायदेशीर उपाय आहे. रोज कमीत कमी 3 वेळा कापसाने चामखीळीवर हे व्हिनेगार लावा आणि कापूस त्यावर लावून ठेवा. काही दिवसानंतर चामखिळीचा रंग बदलेल आणि तो सुखत जाईल. या शिवाय तुम्ही अॅलोविराचं जेल देखील लावू शकतात.



👉 बेकिंग सोडा: 


चांगल्या त्वचेसाठी फायदेशीर असलेला बेकिंग सोडा चामखीळवर देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोडा ऐरंडीच्या तेलामध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि चामखीळीवर ती पेस्ट लावा. काही दिवसांमध्ये तुम्हाला फरक दिसेल.


Source:- Let's up magazine.

सोमवार, 4 दिसंबर 2017

👉 शरीराला आवश्यक असणारे 'अन्नघटक'!

👉 शरीराला आवश्यक असणारे 'अन्नघटक'!




अनेकदा धावपळीत आपले आहाराकडे दुर्लक्ष होते. यामुळे शरीराला पुरेसे अन्न घटक मिळत नाहीत व परिणामी शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही. म्हणूनच शरीराला कोणते अन्नघटक आवश्यक असतात. त्याचा शरीराला काय फायदा होतो किंवा त्याच्या कमतरतेचे तोटे काय? याविषयी आज जाणून घेणार आहोत...



👉 कॅल्शियम

● कोणत्या पदार्थातून मिळते -

शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, ज्वारी, राजगिरा यांमध्ये कॅल्शियम असते. याबरोबरच खरबूज, खजूर आणि मुळा, कोबी या भाज्यांमध्येही कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते.

● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -

 हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.

● शरीराला उपयोग काय -

कॅल्शियम हे शरीरातील सर्वात मुख्य खनिज असून ते हाडांच्या बळकटीसाठी आणि शरीराच्या पोषणासाठी आवश्यक असते.



👉 लोह

● कोणत्या पदार्थातून मिळते -

खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी या पदार्थामधून लोह मिळते.

● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -

महिलांमध्ये साधारणत: लोहाची कमतरता असल्याने त्यांना विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. तसेच लोहाची कमतरता झाल्यास शरीरात रक्ताची कमतरता भासते. त्यामुळे अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.

● शरीराला उपयोग काय -

शरीराची योग्य पद्धतीने वाढ व्हावी यासाठी हा घटक अत्यावश्यक असतो.



👉 आयोडिन

● कोणत्या पदार्थातून मिळते -

 शिंगाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण या पदार्थांमध्ये आयोडिन असते.

● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -

याची कमतरता असलेल्यांना थायरॉइडची समस्या, केस गळणे, नैराश्य किंवा बैचेनी असे त्रास उद्भवू शकतात.

● शरीराला उपयोग काय -

शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूचा बचाव करण्याचे काम आयोडिनव्दारे केले जाते.



👉मॅग्नेशियम

● कोणत्या पदार्थातून मिळते -

बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं या पदार्थांमध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असते.

● अभावामुळे उद्भवणारे परिणाम -

 मॅग्नेशियमची कमतरता असेल तर उदास होणे, आळस येणे, ताण येणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोड येणे, नपुंसकता किंवा वांझपणा अशा तक्रारी उद्भवतात.

● शरीराला उपयोग काय -

मॅग्नेशियममुळे पेशीचे कार्य सुधारते आणि ते शरीरातील रेचक म्हणून काम करते.

शनिवार, 2 दिसंबर 2017

👉 ढेकर का येत असतील बरं...!

👉 ढेकर का येत असतील बरं...!





ढेकर येणं हा पचनक्रियेचा एक भाग आहे. अनेक वेळा आपला असा समज असतो कि, ढेकर आला म्हणजे पोटभर जेवण झालं किंवा जेवण चांगलं झालं. मात्र ढेकर येण्याचे वेगवेगळे कारणे आहेत. म्हणूनच ढेकर येण्याची नेमके काय कारणे आहेत त्याविषयी जाणून घेऊयात...


👉 खाण्यावेळी जांभया देताना मोठे तोंड उघडले तर जास्तप्रमाणात हवा शरीरात जाते. जास्त हवा गेल्याने सारखे-सारखे ढेकर येऊ शकतात.


👉 पचनक्रियेवर परिणाम झाल्याने बद्धकोष्ठता किंवा अपचन होते. यामुळे पोटात गॅस निर्माण होऊन ढेकर येतात. पचनक्रियेच्या मदतीसाठी पोटात जीवाणू असतात. त्यांच्यात काही बिघाड झाल्यानेसुद्धा ढेकर येतात.


👉 काहीजण लवकर-लवकर, मोठे-मोठे घास खातात. मोठे-मोठे घास घेतल्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो आणि जास्त ढेकर येतात.


👉 उपाशी असल्यामुळे पोटात बाहेरची हवा जमा होते. जमलेली हवा ढेकरच्या रुपात शरीराबाहेर फेकली जाते.


👉 कार्बोनेटयुक्त पेये, जंक फूड, कोबी, मटार, डाळी या सारख्या पदार्थांमुळे पोटात गॅस निर्माण होतो. हे पदार्थ खाल्ल्यावर जास्त ढेकर येतात.


👉 धुम्रपान केल्याने सिगारेटच्या धुराबरोबर बाहेरची हवासुद्धा शरीरात जाते. ही हवा ढेकरद्वारे बाहेर फेकली जाते.


👉 हिरड्यांमध्ये योग्यरीत्या दात बसवले नाही तर त्यात फट निर्माण होते. काही खाताना-पिताना हवा शरीरात जाते. यामुळे सारखे-सारखे ढेकर येऊ शकतात.


👉 काही वेळा ताण-तणाव असल्यामुळे काहीजण अाहाराचे अतिसेवन करतात. ज्यामुळे पचनक्रियेवर परीणाम होतो आणि पचनक्रिया मंदावते. हे देखील सारखं-सारखं ढेकर येण्याचं कारण बनते.


शुक्रवार, 1 दिसंबर 2017

👉 जागतिक एड्स दिवस; सतर्क रहा, सुरक्षित रहा

👉 जागतिक एड्स दिवस; सतर्क रहा, सुरक्षित रहा



1 डिसेंबर म्हणजेच जागतिक एड्स दिवस. या पार्श्वभूमीवर या आजाराबद्दल जनजागृती करण्याकरिता आणि एड्सग्रस्त व्यक्तींना समाजातून वेगळे न टाकता समाजाचा एक भाग बनवून घेण्याकरिता हा दिवस संपूर्ण जगभर साजरा केला जातो.


👉 एड्स म्हणजे काय?

एड्स हा एक गंभीर आजार आहे. AIDS(Acquired Immune Deficiency Syndrome) एड्स म्हणजे एचआयव्ही जिवाणूंचा संसर्ग होणे. एच.आय.व्ही. संसर्गापासून एड्स होईपर्यंत 8 ते 10 वर्षांपेक्षाही अधिक काळ लागू शकतो. एचआयव्ही बाधित असण्याच्या शेवटच्या स्टेजमध्ये रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते त्याला एड्स असे म्हणतात.



👉 एचआयव्ही आणि एड्स मध्ये फरक काय?

एचआयव्ही जिवाणूंचा संसर्ग झाल्याने रोग्याची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. याला एचआयव्ही बाधीत असणे असे म्हणतात. तर एड्स ही एचआयव्ही लागण झाल्यानंतरची शेवटची स्टेज आहे. तोपर्यंत रोग्याच्या संपुर्ण शरीरामध्ये जीवाणू पसरल्याने त्यांचे एडस या भयकंर रोगात रुपांतर झालेले असते.

👉 एचआयव्हीची लागण कशी होते?

एचआयव्ही बाधीत व्यक्ती असलेल्याशी असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त चढवल्याने, संसर्गित आईकडून अर्भकाला, बाधित आईकडून स्तनपान करणार्‍या मुलाला, दूषित सुईतून, त्वचेवरील जखमेतून दुस-या निरोगी व्यक्तीला हा संसर्ग होण्याची शक्यता असते.

👉 एचआयव्हीची लागण झाल्याचे लक्षणे?

एचआयव्हीची लक्षणे प्रत्येक व्यक्तीनुसार निरनिराळी असू शकतात. सुरुवातीला अशा व्यक्तींमध्ये ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे अशी लक्षणे आढळतात. ही लक्षणे रुग्णामध्ये पहिल्या आठवड्यात दिसतात. नंतर पुढे ओरल ट्रश, महिलांमध्ये व्हर्जायनल इनफेक्शन, डायरिया, त्वचेवर रॅशेस येणे, वजन कमी होणे, गुप्तांगांमध्ये फोड येणे, नाकपुड्यांमध्ये सूज येणे ही लक्षणे दिसू लागतात.

👉 एचआयव्ही टाळण्यासाठी?

एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध टाळा I लैंगिक संबंधाच्यावेळी कंडोमचा वापर करा, असुरक्षित यौनसंबंध टाळा I जर तुम्ही एच.आय.व्ही. ने संक्रमित असाल तर रक्तदान करू नका I रक्त चढवण्यापूर्वी ते एच.आय.व्ही.मुक्त आहे याची खात्री करून घ्या I इंजेक्शन घेताना प्रत्येक वेळी नवीन सुईचा वापर करा I लग्न ठरल्यानंतर पत्रिकेआधी एचआयव्ही टेस्ट करा.