25 डिसेंबर रोजी प्रभू येशुंच्या जन्मदिवस म्हणून ख्रिश्चन समुदाय ख्रिसमस सण साजरा करतात. आनंद आणि उत्साहाचे प्रतिक असलेला हा सर्वात मोठा सण आहे. ख्रिसमस ट्री सजवणे, सांताचे गिफ्ट आणि कार्ड पाठवणे अशा प्रमुख गोष्टीने हा सण साजरा केला जातो. आपल्याला बऱ्यापैकी हा सण का साजरा करतात याविषयी माहिती नसते म्हणूनच कोण आहेत सांता क्लॉज, का सजवतात ख्रिसमस ट्री? याविषयी जाणून घेणार आहोत.
🎅सांता क्लॉज
सध्याच्या युगात सांता क्लॉज खिसमसचा प्रमुख घटक आहे. दीडहजार वर्षांपूर्वी जन्मलेले संत निकोलस यांना खरा सांता आणि सांताचे जनक मानले जाते. यांच्याशिवाय ख्रिसमस अपूर्ण मानला जातो.
कोण होते नाताळबाबा?
संत निकोलस (नाताळबाबा) यांचा जन्म तिसऱ्या शतकात येशुनंतर 280 वर्षांनंतर एका श्रीमंत कुटुंबात पटारा येथे झाला. प्रभू येशुंवर त्यांची लहानपणापासूनच नितांत श्रद्धा होती. मोठे झाल्यानंतर ते ख्रिश्चन धर्माचे पादरी (पुजारी) आणि नंतर बिशप बनले. ते लहान मुलांना आणि गरिबांना नेहमी गिफ्ट देत होते. संत निकोलस नेहमी गिफ्ट मध्यरात्रीच देत असत कारण ते स्वतःची ओळख जगासमोर आणू इच्छित नव्हते.
ख्रिसमस ट्री का सजवतात?🎋🎄🎊
महापुरुष येशुंचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या देवतांनी सदाबहार वृक्षाला तारे, चांदण्यांनी सजवले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी या सदाबहार वृक्षाला 'ख्रिसमस ट्री' प्रतिक स्वरुपात सजवले जाते. या झाडाला सजवण्याची प्रथा जर्मनीत दहाव्या शतकापासून सुरु झाली आणि याची सुरुवात करणारा पहिला व्यक्ती बोनिफेंस टुयो नावाचा एक इंग्रज धर्मप्रचारक होता.
ख्रिसमस कार्डची प्रथा कशी सुरु झाली?🎟
ख्रिसमसच्या दिवशी सर हेन्री कोले यांनी 1843 मध्ये सर्वात पहिले ख्रिसमस कार्ड पाठवले. त्यामुळे याला पहिले ख्रिसमस कार्ड मानले गेले. या कार्डवर एका शाही कुटुंबाचे तीन पिढ्यांचे फोटो होते. तसेच गोर गरिबांना मदत केल्याचे देखील फोटो होते. सोबतच ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ख्रिसमस कार्डची सुरुवात झाली.
🎅🎅 ख्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा, मेरी ख्रिसमस...!🎅🎅
आवडलं तर नक्की share करा आणि like करा🙏
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें