👉 तुम्ही मोबाईलच्या आहारी गेला आहात?
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मोबाईल आपल्या हाती आला खरा पण त्यावर आपण बरंच अवलंबून राहू लागलोय. इतंकच नाही तर बऱ्याच अंशी आपण मोबाईलच्या आहारी जात असल्याचंही समोर येतंय. त्यामुळे आता एका मोबाईल कंपनीनेच याबाबत एक आगळीवेगळी मोहीम सुरु केली आहे.
मोटोरोला या मोबाईल कंपनीने #phonelifebalance ही मोहीम सुरु केली आहे. याद्वारे त्यांनी यूजर्सला एक प्रकारे सावध करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. 'तुम्ही मोबाईलचे मालक आहात, मोबाईल तुमचा मालक नाही.' या टॅगलाईनखाली मोटोरोलाने #phonelifebalance ही मोहीम सोशल मीडियावर सुरु केली आहे.
आजघडीला चार लोकं एकत्र आल्यानंतरही जवळजवळ प्रत्येकजण हा फोनमध्येच बिझी असतो. या गोष्टीचे प्रमाण कमी होणे गरजेचे आहे. हे ओळखून मोटोरोलाने हे नवे पाऊल उचलले आहे. वारंवार फोन चेक करणे, सतत फोन आपल्या हातात असणे ही फोनच्या आहारी जाण्याची लक्षणे आहेत.
मात्र आपण फोनच्या आहारी गेलो आहात की नाही? हे तपासण्यासाठी मोटोरोलाने एक खास 'क्विझही' (प्रश्नावली) आणले आहे. यामध्ये यूजर्ससाठी फोन वापरासंबंधी काही वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्ही फोनच्या किती आहारी गेले आहात याचे उत्तर तुम्हाला तात्काळ मिळेल. यासाठी वेगवेगळ्या लेव्हल देण्यात आल्या आहेत. तुम्ही जर पाचव्या लेव्हलपर्यंत पोहोचलात तर तुम्ही फोनच्या प्रचंड आहारी गेला आहात एवढं निश्चित.
_चला तर मग चेक करा तुम्ही फोनच्या आहारी गेला आहात की नाही?...
त्यासाठी क्लिक करा
https://goo.gl/s9qYMn
Source:-Letsup magazine.