गुरुवार, 27 दिसंबर 2018

माझी कन्या भाग्यश्री योजना काय आहे ?

'माझी कन्या भाग्यश्री योजना ' आहे तरी काय?



👉 योजनेचा लाभ कोणाला घेता येतो?


१) ज्या परिवारात पहिले व दुसरे अपत्य कन्या अपत्य असेल आणि ज्या परिवाराचे वार्षिक उत्पन्न हे सात लाख पन्नास हजार (७.५० लाख ) रुपये एवढे असेल अश्या परिवारास या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
२) हा लाभ फक्त कन्या अपत्य म्हणजे मुली असलेल्या परिवारास घेता येऊ शकतो.
३)या योजनेच्या पात्रतेसाठी सदर परिवार हा मूळ रुपात महाराष्ट्राचा नागरिक असावा म्हणजेच महाराष्ट्र domacile असावा.
४)या योजनेचा लाभ फक्त एकूण २ मुली अपत्यां पुरता मर्यादित आहे.

तिसरे अपत्य 👧मुलगी किंवा  👦मुलगा काहीही झाले तर या योजनेचा लाभ सरकार रद्द करते.



👉👉योजनेचा हेतू :-


--- माझी कन्या भाग्यश्री हि योजना महाराष्ट्र सरकार तर्फे राबवण्यात येते.
--- गरीब मुलींना चांगले शिक्षण घेता यावे तसेच राज्यात स्त्री पुरुष लिंगदर याचा समतोल राखने, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी हि योजना राबवली जाते.



👉 या योजनेचे फायदे:-


१) ज्या परिवारात एका किंवा २ मुलींच्या जन्मानंतर परिवार नियोजन (नसबंदीचे ओपरेशन) केले असेल त्या परिवारास या योजनेचा लाभ घेता येतो.
२) या योजनेनुसार जर एक कन्या असेल तर सरकार तिच्या नावे ५०,००० रुपये तर २ कन्या असतील तर प्रत्येकी २५००० रुपये मुलीच्या नावे बँक खात्यामध्ये जमा केले जातात.
३) त्या मुलीचे वय वर्ष ६ आणि १२ वर्ष झाल्यावर त्या रकमेचे व्याज काढता येते. उर्वरित बाकीची सर्व रक्कम व व्याज मुलीचे वय १८ नंतरच वापरता येते. या दरम्यान जर तिसरे अपत्य जन्माला आले तर सरकार ह्या योजनेचे लाभ लगेच रद्द करते.



📃अर्जाचा नमुना:-


१)

२)

३)


 ४)

तरी वरील अर्ज व इतर माहिती pdf स्वरूपात download करण्यासाठी येथे 📲 क्लिक करा.



धन्यवाद 🙏
माहिती आवडल्यास नक्की share करा व आमच्या फेसबुक page ला पण like करा व असेच नवीन updates मिळवा 🙏

रविवार, 15 जुलाई 2018

प्रधानमंत्री मुद्रा योजना

 

प्रधानमंत्री मुद्रा योजना बद्दल माहिती



प्रधानमंत्री मुद्रा योजना हि केंद्र सरकार तर्फे २०१५ पासून सुरु करण्यात आली आहे. ह्या योजनेचा उद्देश छोट्या उद्योगांना छोटी रक्कम लोन च्या रुपात दिली जाते.


काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना?




ह्या योजनेचा उद्देश छोट्या उद्योगांना कर्ज मिळवून देणे आहे.
तसेच उद्योगांना मदत करून रोजगार तयार करणे. जर आपल्याला आर्थिक मदत अडचण असेल तर आपण जरूर या योजनेचा विचार करू शकता.


योजनेचे लाभ


१)या योजने अंतर्गत बिना गॅरंटी लोन 
२)शून्य प्रोसेसिंग फी
३)लोन फेडण्याचा कालावधी वर्ष ५ पर्यंत असू शकतो
४)मुद्रा कार्ड ज्याच्या मदतीने हवे असेल तेवढि रक्कम काढू शकतो.



लाभार्त्यांची पात्रता

ह्या योजनेसाठी कोणीही आपला अर्ज नोंदवू शकतो.





शिशु लोन:- ५०,००० पर्यंत कर्ज
किशोर लोन:- ५०,०००-५,००,०००(५ लाख) पर्यंत कर्ज
तरुण लोन :- ५ लाख ते १० लाख पर्यंत कर्ज

लाभार्थी हा कोणत्याही बँकेत defaulter नसावा

सूचना:- 
ह्या योजनेअंतर्गत कोणताही व्याजदर हा ठराविक नसून तो बँकेच्या नियमानुसार बदल असू शकतात. परंतू साधारणतः १२% कमीत कमी व्याजदर ठरलेला असतो.


आवश्यक कागदपत्रे


अर्जदाराच्या कर्ज पात्रते नुसार कागतपत्रे कमी जास्त होऊ शकतात याची कृपया नोंद घ्यावी 🙏

१) ओळखिचा पुरावा
Voter ID/ Driving License/Pan Card

२)पत्त्याचा पुरावा
लाईट बिल/Voter Id/Adhar Card/Passport

३)उद्योगाच्या कामाचा / पत्त्याचा पुरावा
Copies of relevant licenses/registration certificates/other documents pertaining to the ownership, identity and address of business unit.

४)बँकेचे मागील ६ महिन्याचे अकाउंट स्टेटमेंट

५)मागील २ वर्षाचे सेल्स टॅक्स रिटर्न ( बॅलन्स sheet file)

६) २ पासपोर्ट size फोटो.
--------------------------------×●×-------------------------------------------------------------------------------------------------

अर्ज DOWNLOAD करण्यासाठी येथे क्लिक करा.

किंवा अधिक माहिती साठी  खालील संकेतस्थळाला भेट द्या 


धन्यवाद 🙏
माहिती आवडल्यास नक्की share करा व आमच्या फेसबुक page ला पण like करा व असेच नवीन updates मिळवा 🙏


मंगलवार, 24 अप्रैल 2018

👉फायरमन नेव्हल डॉकयार्ड मुंबई. 2018

👉फायरमन नेव्हल डॉकयार्ड मुंबई.



पोस्ट : फायरमन नेव्हल डॉकयार्ड

जागा : 95

पात्रता : दहावी

वय : दि. 15 मे 2018 रोजी 18 ते 25 वर्षे [sc/st- 3 वर्षे सूट , obc -03 वर्षे सूट ]

नोकरी ठिकाण : मुंबई

वेतन: ₹19,000 ते ₹62,000

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरवात : 24 एप्रिल 2018.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत : दि. 21 मे 2018

अधिक माहितीसाठी : www.bhartiseva.com

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :   
                             www.indiannavy.nic.in

Thank you pls share and follow us on fb also😊

गुरुवार, 22 मार्च 2018

प्रधानमंत्री आवास योजनेत आपले नाव आहे का?

PRADHAN MANTRI AAWAS YOJNA प्रधानमंत्री आवास योजना २०१७-२०१८ ची यादी जाहीर झाली आहे. आपण आपले नाव यादीत आहे का? हे पाहण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. आपण online पद्धतीने घरबसल्या तुमच्या mobile वरून check करू शकता.


तत्पूर्वी आपण कोणत्या कोणत्या financial वर्षा साठी व राज्याचे पाहू शकता यावर नजर टाकून घेऊया.

वर्ष :-
2011-2012, 2012-2013, 2013-2014, 2014-2015, 2015-2016, 2016-2017 आणि  2017-2018. 

राज्यांची यादी :-
अरुणांचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ़, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमांचल प्रदेश, जम्मू व कश्मीर, झारखंड, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपुर, मेघालय, मिजोरम, नागालैंड, उड़ीसा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तमिलनाडु, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान व निकोबार, दादर व नगर हवेली, दीव व दमन, लक्ष्यद्वीप, पुडुचेरी, आँध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगना

आपण आपले नाव यादित आहे की नाही हे खालील दिलेल्या पद्धतीने check करू शकता 


१)प्रथम पुढील दिलेल्या लिंक वर click करा iay.nic.in .

२) त्यानंतर Ministry Of Rural Development Government Of India ची official पेज उघडेल.

३) त्यानंतर पुढील pathचा अवलंब करा
Reports > 
A. Physical Progress Reports त्यामध्ये
6. Registration and sanction details >
जर आपल्याला 2017-18 साठी पाहायचे असेल तर 2017-18 वर क्लिक करा व नंतर Pradhan Mantri Awas Yojana



४) त्यानंतर पहिले राज्य(state)- जिल्हा(district)-तालुका (taluka)-पंचायत (panchayat)





५)जेव्हा आपण आपले ग्रामपंचायत मिळेल, तेव्हा Beneficiaries Registered व Houses sanctioned च्या खाली संख्या दिलेल्या असतील. या संख्येवर टॅप करा.


६) आता पंतप्रधानांच्या गृहनिर्माण योजनेमध्ये 2017-2018 या नावाने ग्रामपंचायतीचे नाव देण्यात आले आहे व त्यामध्येBeneficiary Name सर्व लाभार्त्यांची यादी प्राप्त होईल.

जर आपल्याजवळ अँड्रॉइड मोबाईल असेल तर आपण android app वर सुद्धा हि माहिती पाहू शकता🙏
आत्ता👉 Download 👈 करा

 कृपया आपले नाव जर यादीत नसेल तर चिंता नसावी कारण हे सरकारी पोर्टल आहे त्यामुळे आपला डेटा कदाचित enter केलेला नसावा त्यासाठी वेळ लागू शकतो.

धन्यवाद 🙏
माहिती आवडल्यास नक्की share करा व आमच्या फेसबुक page ला पण like करा व असेच नवीन updates मिळवा 🙏

मंगलवार, 20 फ़रवरी 2018

👉 लिंबूपाणी पिण्याचे घरगुती उपाय व फायदे असेही आहेत!

लिंबूपाण्याचे असेही फायदे व घरगुती उपाय!

         

     लिंबू हे फळ नेहमी आपल्या स्वयंपाक घरात सर्रास वापरले जाते. आता उन्हाळा हळू हळू वाढत असताना लिंबू पाणी सेवन करणे फायद्याचे ठरते. लिंबू पाणी आपल्या शरीरात ऊर्जा प्रदान करते त्यामुळे ते नेहमीच उपयोगी ठरते असेच काही घरगुती उपाय व फायदे आपण आता जाणून घेऊया.


१)वजन कमी करणे.  

            जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हा सोप्पा घरगुती उपाय करून पहा. उपाय असा आहे की रोज सकाळी कोमट पाण्यामधील लिंबू सरबत सेवन करा त्यासाठी कोमट पाण्याच्या एका ग्लास मध्ये लिंबाचा रस घालून ते किमान २ वेळा सेवन करावे. प्रत्येक तासाला एक एक ग्लास पाणी प्या यामुळे भूक कमी लागेल आणि शरीराचे संतुलन राखले जाते. ह्या क्रियेमुळे पचन तंत्र सुधारते.


२) पोटाचे विकार दूर होतात. 

           जर तुम्हाला काही पोटाचे विकार असतील तर हे नक्की करून पहा. रोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते व पोटाचे विकार दूर होतात. पचन क्रिये बरोबरच ऍसिडिटी चा त्रासही होत नाही त्यामुळे पोट खराब असलंयास लिंबूसरबत फायद्याचे ठरते.


३) किडनी स्टोन च्या आजारावर फायदेशीर. 

            रोज लिंबूसरबत घेतल्याने आरोग्य सुधारते त्याचबरोबर मुतखडा होणे हे विकार हि दूर होतात.लिंबूसरबतामुळे शरीर हायट्रेड होण्यास मदत होते. त्यामुळे युरिन ब्लॉक होणे हा त्रास कमी होतो .


४)मधुमेहावर गुणकारी.

          साखरेचे प्रमाण असलेले पेय याचे सेवन करण्यापेक्षा लिंबू सरबतचे सेवन करणे कधीही फायद्याचे. लिंबूसरबतामुळे  रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते. शरीर हायट्रेड राहते व शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.


       तर हे होते लिंबूपाणी पिण्याचे फायदे व घरगुती उपाय. लेख आवडल्यास नक्की share करा व हि माहिती आपल्या प्रियजनांना सांगा.

शुक्रवार, 2 फ़रवरी 2018

👉काय आहे बजेट 2018? जाणून घ्या!

💰 बजेट 2018 


▫ इन्कम टॅक्स रचनेत कोणताही बदल नाही, अडीच लाख रुपये उत्पन्न करमुक्तच राहणार

▫ ज्येष्ठ नागरिकांना 50 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज

▫ मोबाइलवरील कस्टम ड्यूटी 15 टक्क्यांवरून वाढवून केली 20 टक्के, मोबाइल खरेदी महागणार

▫ राष्ट्रपतींचा पगार 5 लाख, उपराष्ट्रपतींचा पगार 4 लाख तर राज्यपालांचा पगार 3 लाख रूपये

▫ खासदारांचा पगार एप्रिल 2018मध्ये वाढणार, दर पाच वर्षांनी महागाई दराप्रमाणे पगार वाढेल

▫ पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 1 कोटी पेक्षा जास्त घरे बांधली जात आहेत

▫ प्रधानमंत्री सौभाग्य योजनेतून 4 कोटी घरांना मोफत वीज कनेक्शन देण्याची योजना

▫ कृषी उत्पादन तयार करणाऱ्या 100 कोटींचं उत्पन्न असणाऱ्या कंपन्यांना टॅक्समध्ये 100 टक्के सवलत

▫ कृषी उत्पादक कंपन्या पहिल्या पाच वर्षांसाठी 100 टक्के करमुक्त

▫ क्रिप्टोकरन्सीला सरकार कायदेशीर समजत नाही

▫ रोखीने टोल देण्याची सिस्टम डिजिटल करणार

▫ मुद्रा योजनेमध्ये 76 टक्के लाभधारक महिला असून, 50 टक्के एससी, एसटी आणि ओबीसी आहेत, 3 लाख रुपये कर्ज वाटपाचे लक्ष्य

▫ स्टार्ट अप आणि उद्योग विकासासाठी मोदी सरकारचा नवा प्लान, नोटबंदीनंतर उद्योगांचं नुकसान भरून काढण्यासाठी लघुउद्योगांसाठी 3 हजार 700 कोटींची तरतूद

▫ नव्या कर्मचाऱ्यांना ईपीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम देणार

▫ सर्व क्षेत्रातील नवीन कर्मचाऱ्यांचा 12 टक्के पीएफ सरकार भरणार

▫ महिला कर्मचाऱ्यांचा ईपीएफ 8 टक्के करण्याची शिफारस

▫ प्राईम मिनिस्टर फेलोशिप योजनेतून 1000 बी.टेक विद्यार्थ्यांची निवड होणार

▫ 10 कोटी गरीब कुटुंबांसाठी राष्ट्रीय आरोग्य सुरक्षा योजना आणत आहोत, त्याचा 50 कोटी लोकांना लाभ मिळणार

▫ आदिवासी मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी 'एकलव्य स्कूल' उभारणार

▫ नॅशनल हेल्थ पॉलिसी अंतर्गत येणारी 1.5 लाख सेंटर्स लोकांच्या घराजवळ पोहोचवण्याचा प्रयत्न, हे सेंटर्स मोफत तपासणी आणि औषधं देणार, 12 हजार कोटी यासाठी मंजूर

▫ नमामी गंगा कार्यक्रमातंर्गत नदी स्वच्छतेच्या 187 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, 16173 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

▫ टीबी रोखण्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद

▫ 24 नवी मेडिकल कॉलेज देशभर उभारणार, 3 लोकसभा मतदान संघाच्या मागे एक मोठं हॉस्पिटल उभारणार

▫ राष्ट्रीय स्वास्थ विमा' योजना 1200 कोटी रूपये खर्च करून देशभर उभारणार

▫ प्रत्येक राज्यामध्ये किमान एक सरकारी वैद्यकीय महाविद्यालय असेल

▫ आरोग्यसुविधा सुधारण्यासाठी 'आयुषमान भारत' कार्यक्रम राबविण्याचा निर्णय

▫ आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील सेस 3 वरुन 4 टक्क्यांवर, एका टक्क्याची वाढ 

▫ शिक्षण आणि आरोग्यावरील सेस दर एका टक्क्यानं वाढणार

▫ शेअर बाजरातील शेअर्सच्या विक्री व्यवहारावर कर भरावा लागणार

▫ यावर्षी 8.27 कोटी लोकांनी कर भरला, गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 लाख लोकांची वाढ

▫ 1 लाख ग्राम पंचायती ऑप्टीक फायबरने जोडण्याचे काम पूर्ण, ग्रामीण भागात 5 लाख वायफाय स्पॉट बनवण्यात आले आहेत

▫ तीन सरकारी विमा कंपन्यांचे विलिनीकरण करुन एकच कंपनी बनवणार

▫ सध्या 124 विमानतळे सेवेत, कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी उडान योजनेला बळ

▫ विमानतळांची संख्या 5 टक्क्यांनी वाढवणार, 900 नव्या विमानांची खरेदी करणार

▫ 25 हजारापेक्षा जास्त फुटबॉल असणाऱ्या रेल्वे स्थानकांवर एक्सलेटर बसवण्यात येणार, सर्व रेल्वे स्थानक आणि ट्रेनमध्ये वायफाय आणि सीसीटीव्ही बसवण्यात येणार 

▫ 11 हजार कोटी रूपये खर्चून मुंबईत 90 किमीच्या रेल्वे ट्रॅकच्या दुहेरीकरणाचं काम सुरू

▫ 18 हजार किलोमीटरच्या रेल्वेमार्गाचं दुहेरीकरण करण्याचं काम हाती, 3600 किमीचे ट्रॅक नव्याने बांधण्याचं काम हाती

▫ आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी 1.38 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे, चालू आर्थिक वर्षात 1.22 लाख कोटींची तरतूद होती.

▫ रेल्वे सेवेच्या विकासासाठी वर्षात 1 लाख 48 हजार कोटींचा निधी खर्च करणार

▫ 600 रेल्वेस्थानकांचा विकास सुरु, विविध सोयी-सुविधा उपलब्ध होणार

▫ 9 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचं सरकारचं लक्ष्य

▫ अमृत योजनेअंतर्गत 500 शहरांना शुद्ध पिण्याचं पाणी पोहचविण्याचे लक्ष्य

▫ 56 हजार कोटींचा निधी अनुसुचित जातींच्या विकासासाठी मंजूर तर अनुसुचित जमातींच्या विकासासाठी 39,135 कोटी रूपयांना निधी मंजूर

▫ यंदाच्या वर्षात 70 लाख रोजगार निर्मिती झाल्याचे स्वतंत्र सर्वेक्षणातून समोर

▫ प्री-नर्सरी ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाचं धोरण एकच राहील याची काळजी घेणार

▫ शिक्षकांचा दर्जा सुधारला तर शिक्षणाचाही दर्जा सुधारेल, शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देण्याकडे भर, 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम, डिजिटल शिक्षण देण्याची योजना

गुरुवार, 1 फ़रवरी 2018

👉चष्म्याचा नंबर कमी करायचाय? मग हे करून पहा !

  👉चष्म्याचा नंबर कमी करायचाय? मग हे करून पहा !

         कमी वयात चष्मा लागणे हि काहींसाठी नक्कीच खेदाची गोष्ट असते आणि त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. त्यामुळे काहींचा चष्मा जातो पण काहींना मात्र ही समस्या त्रास देत राहते. 
        अयोग्य आहार ,वाढणारे वय किंवा डोळ्यांवर येणार तणाव , सतत मोबाईल वापर इत्यादी कारणांनी चष्मा लागतो. परंतु जर अगदी सहज सोप्या पद्धतीने चष्म्याचा नंबर टाळता आला किंवा कमी करता आला तर किती छान! 





चष्मा लागण्याची कारणे

१) अयोग्य आहाराच्या सवयी, वाढते वय
२)डोळ्यांवर येणार तणाव (अति प्रकाश यामुळे)
३)अनुवांशिक 
४)डोळ्यांची निगा न राखणे.


चष्मा कमी करण्यासाठीचा व्यायाम

१)
दिवसातील काही काळ सूर्यप्रकाशात घालवावा. काही वेळ डोळे बंद करून सूर्यप्रकाशकडे पाहत उभे राहावे.

२)
दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून गरम करून ते बंद डोळ्यावर ठेवावे. हाताने डोळे पूर्ण झाकून घ्यावे व हि क्रिया दिवसातून ५-६ वेळा किंवा जमेल तेव्हा करावी.

३)
नेहमी रात्री ४-५ बदाम पाण्यात भिजवून ठेवावे आणि सकाळी साल काढून गरम दुधातून सेवन करावे त्यामुळे नजर चांगली राहते.

४)
एक पेन डोळ्यासमोर एक हात दूर अंतरावर ठेवावी व एकटक पाहत राहावे. हळूहळू नाक पेनाच्या जवळ न्यावे.जसजसा पेन जवळ येईल तसे नजर केंद्रित होणे कमी होईल. हा व्यायाम दिवसातून १०-१५ वेळा करावा.

५)
डोळा घड्यालाच्या दिशेने किंवा उलट्या दिशेने ६-७ वेळा फिरवावे.

तर हे नक्की करून पहा आवडल्यास नक्की आपल्या प्रियजनांसोबत share 👍 व आमच्या fb पेजला पण like करा😊

सोमवार, 29 जनवरी 2018

टेन्शन घ्यायचंच नाही... आयुष्य बिनधास्त जगायचे...

टेन्शन घ्यायचंच नाही...



आयुष्य बिनधास्त जगायचे... कुणाचे वाईट करायचे नाही... कुणाचे वाईट चिंतायचे नाही... कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही... फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं... काही कमी पडत नाही... आणि फरक तर अजिबात पडत नाही... कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही...  लोकांची विविध रूपे असतात... सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात... *ज्याच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो*...



आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण?...

कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो... आपण त्याच्या विषयी तसेच इतरां विषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे... बोलण्यात स्पष्ट वक्ते पणा ठेवायचा...
  कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही... आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही...
फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हीत चिंतायचे... कुणाच्या पुढेपुढे करायचे नाही...

*परमेश्वर काही कमी पडून देत नाही, आणि परमेश्वराची साथ तुम्हाला कायम मिळते*

"जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची..."
   
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन  आयुष्यातील चिंता घालवतात.

     😄😄  नेहमी हसत रहा 😄😄

⚜ हा सुंदर जन्म पुन्हा नाही  ⚜

मंगलवार, 23 जनवरी 2018

🏦 स्टेट बँक मध्ये करियरची संधी

🏦 स्टेट बँक मध्ये करियरची संधी



पोस्ट : ज्युनिअर असोशिएट (कस्टमर सपोर्ट & सेल्स) - जागा : 8301 - पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वय : दि. 01 जानेवारी 2018 रोजी 20 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फी : 600 रुपये

परीक्षा : पूर्व परीक्षा - मार्च/एप्रिल 2018 I मुख्य परीक्षा - 12 मे 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत : दि. 10 फेब्रुवारी 2018

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/ecXFAs

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/mTFWMY

Thank you pls share and follow us on fb also😊

MHT CET 2018 प्रवेश परीक्षा

MHT CET 2018 प्रवेश परीक्षा




पोस्ट : अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech.)

पोस्ट : औषध निर्माता पदवी (B. Pharm/Pharm D.)

पोस्ट : कृषी पदवी (B.Sc.(HONOURS)/B.Tech)

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र & गणित) आणि रसायनशास्त्र/जैवतंत्रज्ञान/जीवशास्त्र/तांत्रिक/ व्यावसायिक विषय यापैकी एक विषय  किंवा  50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 50% गुणांसह B.Sc.पदवी

फी : 800 रुपये

प्रवेशपत्र : दि. 24 एप्रिल ते 10 मे 2018

परीक्षा : दि. 10 मे 2018

निकाल : दि. 03 जून 2018 किंवा पूर्वी

अर्ज पोहचण्याची मुदत : दि. 25 मार्च 2018 

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/33ozDY

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/9dqEaX


Please share it with ur friend and like our fb page to get regular updates☺

मंगलवार, 16 जनवरी 2018

👉 भारतीय सैन्य दलात/नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका विविध पदांची भरती

👉 भारतीय सैन्य दलात NCC कँडिडेटला स्पेशल एंट्री




पोस्ट : NCC स्पेशल एंट्री - जागा : 55 (पुरुष : 50 व महिला : 05) - पात्रता : 50% गुणांसह पदवीधर, 02 वर्षे NCC मध्ये सेवा

वय : दि. 01 जुलै 2018 रोजी 19 ते 25 वर्षे

फी : नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 08 फेब्रुवारी 2018 

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/LkeSZq

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/PJVSpf


👉 नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती



पोस्ट : मेडिकल सुपरिटेंडेंट - जागा : 01

पोस्ट : ऑब्स्ट्रेट्रीशियन/स्त्रीरोगतज्ज्ञ - जागा : 01

पोस्ट : ऍनेस्थेटिस्ट - जागा : 01

पोस्ट : जनरल सर्जन - जागा : 01

पोस्ट : पॅथोलॉजिस्ट - जागा : 01

पोस्ट : पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर ग्नॉन्कोलॉजिस्ट - जागा : 04

पोस्ट : स्टाफ नर्स - जागा : 02

पोस्ट : प्रयोगशाळा तंत्रज्ञ - जागा : 01

पोस्ट : ANM - जागा : 01

मुलाखतीचे ठिकाण : डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका, श्री गुरु गोविंद सिंघजी स्टेडीयम परिसर, नांदेड.

अधिकृत वेबसाईट : www.nwcmc.gov.in

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/CpxtEH

शुक्रवार, 5 जनवरी 2018

👉 इंडियन ऑईलमध्ये / भारतीय तटरक्षक दल भरती

👉 इंडियन ऑईलमध्ये विविध पदांची भरती




पोस्ट : ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट (प्रोडक्शन) - जागा : 37

पोस्ट : ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट (P &U ) बॉयलर - जागा : 03

पोस्ट : ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट (P &U) टरबाइन - जागा : 03

पोस्ट : ज्युनिअर कंट्रोल रूम ऑपरेटर - जागा : 03

पोस्ट : ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) - जागा : 05

पोस्ट : ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट - जागा : 04

पोस्ट : जुनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट (F & S) - जागा : 01

पोस्ट : ज्युनिअर मटेरियल असिस्टंट - जागा : 01

पोस्ट : ज्युनिअर नर्सिंग असिस्टंट - जागा : 01

वय : दि. 31 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 26 वर्षे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

फी : 150 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 20 जानेवारी 2018

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची मुदत : दि. 31 जानेवारी 2018

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :
Dy. General Manager (HR), Barauni Refinery, P.O. Barauni Oil Refinery, Begusarai, Bihar - 851114 

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/y7dHHe

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/WhGTd4


👉 भारतीय तटरक्षक दल भरती 2018(INDIAN NAVY)




पोस्ट : यांत्रिक - पात्रता : 60 % गुणांसह 10 वी उत्तीर्ण, इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडीओ & पॉवर) डिप्लोमा

वय : 18 ते 22 वर्षे

उंची : किमान 157 सेमी

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 19 जानेवारी 2018

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/fU4JHp

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/A36w1s

कृपया हि पोस्ट सर्वाना नक्की share करा ,एखाद्या गरजवंताला मदत होईल🙏

मंगलवार, 2 जनवरी 2018

👉 राज्यात सनदी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

👉 राज्यात सनदी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी




पोस्ट : उप मुख्य कार्यकारी अधिकारी /गट विकास अधिकारी,गट-अ - जागा : 06

पोस्ट : सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,गट-अ - जागा : 08

पोस्ट : तहसिलदार,गट-अ - जागा : 06

पोस्ट : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,गट-ब - जागा : 04

पोस्ट : कक्ष अधिकारी,गट-ब - जागा : 26

पोस्ट : सहायक गट विकास अधिकारी,गट-ब - जागा : 16

पोस्ट : उप अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क,गट-ब - जागा : 02

पोस्ट : सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क,गट-ब - जागा : 01

वय : दि. 01 एप्रिल 2018 रोजी 19 ते 38 वर्षे

फी : 524 रुपये

परीक्षा : दि. 08 एप्रिल 2018 

परीक्षा केंद्र : महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 18 जानेवारी 2018

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/1cyvSv

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/o4dJA2


👉 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती


पोस्ट : सहायक उपनिरीक्षक/कार्यकारी - जागा : 31

पोस्ट : हेड कॉन्स्टेबल (GD) - जागा : 87

फी : 100 रुपये

अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 25 जानेवारी 2018

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/gkwGNr


सोमवार, 1 जनवरी 2018

👉 ऑनलाईन कामाची आवड असेल तर कमाई होईल बक्कळ...

👉 ऑनलाईन कामाची आवड असेल तर कमाई होईल बक्कळ...




आपले आयुष्य कसे सुखकर करता येईल याचे प्लॅनिंग प्रत्येक जण करत असतो. यासाठी पैसे कमविण्याचे काही नवीन पर्याय शोधले जातात. सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने, या  माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैसे कमविता येतात. कोणती आहेत हि माध्यमं? कसा कमवाल पैसा याविषयीच्या माहितीवर एक नजर...


1) मीडिया वेबसाईट किंवा ब्लॉग : 
         तुम्हाला जर्नालिझमची समज असेल आणि तुम्ही चांगले लिहू शकत असाल तर स्वतःची न्युज वेबसाईट सुरु करु शकता. सध्या डिजिटल किंवा इंटरनेट मीडिया प्रचंड वेगाने वाढत आहे. अनेक लोक डिजिटल मीडिया व्हेंचर उभे करत आहे. यातून तुम्ही चांगली कमाई करु शकता.


2) एफिलिएट्स मार्केटिंग :
          कोणत्याही कंपनीचे प्रॉडक्टचे प्रमोशन आपल्या बेवसाईटवर किंवा ब्लॉगवर करु शकतात. कंपनीच्या अॅडवर येणाऱ्या क्लिक्स आणि प्रॉडक्ट विक्रीच्या हिशोबाने मार्केटर कमिशन देतात. ही एक परफॉर्मन्स बेस्ड मार्केटिंग सिस्टिम असून सध्या 192 अब्ज डॉलरची इंडस्ट्री आहे.


3) फ्रिलांसींग :
            सध्या इंटरनेट मार्केटिंग एजंसी स्पेशलाइज्ड स्किल्स असलेल्या लोकांना फ्रीलान्सर म्हणून हायर करतात. तुम्ही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, व्हिडिओ एडिटिंग, कॉपीराईट्स, वेब डिझाईन, सोशल मीडिया मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन आदी फिल्डमध्ये फ्रीलान्सिंग करु शकता.


4) ई-प्रोडक्ट क्रिएटर :
             तुम्ही स्वतःचे ई-बुक क्रिएट करुन अॅमेझॉन किंडल किंवा क्लिक बॅंकवर विकू शकता. अशा प्रकारे अनेक प्रॉडक्ट तुम्ही विकू शकता. तसेच ऑडिओ, व्हिडीओ  तयार करुनही ते विकता येतात. तुम्हाला फोटोग्राफिचा छंद असेल तर त्याचीही ऑनलाईन विक्री करता येते.


5) इंटरनेट मार्केटिंग एजन्सी :
           आयटी-टेलिकॉम किंवा इंटरनेटची तुम्हाला चांगली माहिती असेल तर इंटरनेट मार्केटिंग एजन्सी सुरु करून पैसे कमवता येऊ शकतात. कारण याचा खर्च कमी असल्याने सध्या बरेच लोक ट्रेडिशन मार्केटिंग ऐवजी इंटरनेट मार्केटिंगवर भर देत आहेत. जर तुम्ही अशी एजन्सी सुरु केली तर वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोडक्ट वेबसाईट आणि स्मार्टफोनवर प्रमोट करता येऊ शकतात.


बुधवार, 27 दिसंबर 2017

👉पाणी पिण्याची योग्य वेळ व फायदे

👉पाणी पिण्याची योग्य वेळ





● 3 ग्लास सकाळी झोपेतुन उठल्यानंतर -
शरीरातील उर्जेला Activate
करतो.

● 1 ग्लास अंघोळ केल्यानंतर -
ब्लड प्रेशर त्रास संपवतो.

● 2 ग्लास जेवणाआधी 30 मिनीटे -
पचनक्रिया सुधारतो.

● अर्धा ग्लास झोपण्यापुर्वी -
हार्ट अटैक पासुन वाचवतो.

चांगला मैसेज आहे.
जरुर फॉरवर्ड करा..


🌴🍃🌴🍃 🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦🔦

जर तुम्ही घरी एकटे असाल, आणि अचानक तुमच्या छातीतदुखायला लागले,हे दुखणे जर तुमच्या डाव्या हातापासून तुमच्या जबड्या पर्यंतजाणवत असेल..तर हा हृदय विकाराचा झटका असू शकतो....




       जर आजू-बाजूला कोणीच मदत करण्यासाठी नसेलआणि हॉस्पिटल सुद्धा दूर असेल, तर तुम्ही स्वत:ची मदत करूशकता....

१)जोर-जोरात खोकत रहा. हि प्रक्रिया पुन्हा-पुन्हा करत 
  रहा.
२)प्रत्येक वेळी खोकन्या आधी दीर्घ श्वास घ्या.
३)दीर्घ श्वासामुळे फुप्फुशांना अधिक प्रमाणात
    ऑक्सिजन मिळतो.

अशा वेळी खोकत राहिल्याने रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीतचालू राहते.मी, आपणांस एक विनंती करू इच्छितो.. 

कृपया जास्तीत जास्तलोकांना हि पोस्ट शेअर करा.का, कुणास ठाऊक, तुमच्या ह्या एका पोस्टमुळे एखाद्याचे प्राणवाचू शकतात......करा फॉरवर्ड होऊ दे खर्च  जरा चांगल्या कामासाठी


 plz share 📲📲
कुणाच तरी जीव वाचेल

सोमवार, 25 दिसंबर 2017

👉 ख्रिसमस का साजरा करतात? कोण आहे नाताळबाबा?


25 डिसेंबर रोजी प्रभू येशुंच्या जन्मदिवस म्हणून ख्रिश्चन समुदाय ख्रिसमस सण साजरा करतात.  आनंद आणि उत्साहाचे प्रतिक असलेला हा सर्वात मोठा सण आहे. ख्रिसमस ट्री सजवणे, सांताचे गिफ्ट आणि कार्ड पाठवणे अशा प्रमुख गोष्टीने हा सण साजरा केला जातो. आपल्याला बऱ्यापैकी हा सण का साजरा करतात याविषयी माहिती नसते म्हणूनच कोण आहेत सांता क्लॉज, का सजवतात ख्रिसमस ट्री? याविषयी जाणून घेणार आहोत.





🎅सांता क्लॉज


सध्याच्या युगात सांता क्लॉज खिसमसचा प्रमुख घटक आहे. दीडहजार वर्षांपूर्वी जन्मलेले संत निकोलस यांना खरा सांता आणि सांताचे जनक मानले जाते. यांच्याशिवाय ख्रिसमस अपूर्ण मानला जातो.


कोण होते नाताळबाबा?



संत निकोलस (नाताळबाबा) यांचा जन्म तिसऱ्या शतकात येशुनंतर 280 वर्षांनंतर एका श्रीमंत कुटुंबात पटारा येथे झाला. प्रभू येशुंवर त्यांची लहानपणापासूनच नितांत श्रद्धा होती. मोठे झाल्यानंतर ते ख्रिश्चन धर्माचे पादरी (पुजारी) आणि नंतर बिशप बनले. ते लहान मुलांना आणि गरिबांना नेहमी गिफ्ट देत होते. संत निकोलस नेहमी गिफ्ट मध्यरात्रीच देत असत कारण ते स्वतःची ओळख जगासमोर आणू इच्छित नव्हते.



ख्रिसमस ट्री का सजवतात?🎋🎄🎊




महापुरुष येशुंचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचे अभिनंदन करण्यासाठी आलेल्या देवतांनी सदाबहार वृक्षाला तारे, चांदण्यांनी सजवले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी या सदाबहार वृक्षाला 'ख्रिसमस ट्री' प्रतिक स्वरुपात सजवले जाते. या झाडाला सजवण्याची प्रथा जर्मनीत दहाव्या शतकापासून सुरु झाली आणि याची सुरुवात करणारा पहिला व्यक्ती बोनिफेंस टुयो नावाचा एक इंग्रज धर्मप्रचारक होता.



ख्रिसमस कार्डची प्रथा कशी सुरु झाली?🎟


ख्रिसमसच्या दिवशी सर हेन्री कोले यांनी 1843 मध्ये सर्वात पहिले ख्रिसमस कार्ड पाठवले. त्यामुळे याला पहिले ख्रिसमस कार्ड मानले गेले. या कार्डवर एका शाही कुटुंबाचे तीन पिढ्यांचे फोटो होते. तसेच गोर गरिबांना मदत केल्याचे देखील फोटो होते. सोबतच ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ख्रिसमस कार्डची सुरुवात झाली.



🎅🎅 ख्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा, मेरी  ख्रिसमस...!🎅🎅


आवडलं तर नक्की share करा आणि like करा🙏

रविवार, 24 दिसंबर 2017

👉 तुमचे केस पांढरे झालेत का? मग वाचा या टिप्स...

👉 तुमचे केस पांढरे झालेत का? मग वाचा या टिप्स...

आजच्या धावपळीच्या युगात केस अकाली पांढरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. शरीरासाठी आवश्यक असणार्‍या पोषक घटकांची कमतरता, एखादा जुना आजार किंवा काहीवेळा औषधे यांच्यामुळेही केस पांढरे होतात. केस पांढरे झाले की अनेक जण मेहंदी लावणे हा त्यावरील उपाय समजतात मात्र नैसर्गिक उपायांनीही तुमचे केस पांढरे होणे थांबवता येऊ शकते. ते कसे त्याबद्दल खास टिप्स...!




👉 मेथीचे दाणे :

 मेथीच्या दाण्यामध्ये असलेल्या गुणधर्मामुळे केस पांढरे होणे कमी होते. पिण्याच्या पाण्यामध्ये थोडे मेथीचे दाणे टाकून हे पाणी गरम करा आणि रोज एक ग्लास हे पाणी प्या. मेथीचे दाणे आणि पाणी एकत्र करून त्याची पेस्ट बनवा आणि ही पेस्ट डोक्याला लावा.


👉 चहा आणि कॉफी: 

चहा आणि कॉफी दोन्हींमध्ये केस रंगवण्याची व अधिक तपकिरी करण्याची क्षमता  आहे. मात्र त्यासाठी चहा व कॉफीचे मिश्रण दाट असणे आवश्यक आहे. यासाठी चहा पावडर किंवा टी बॅग्सचा वापर करा. व ते गरम पाण्यात मिक्स करून केसांना लावा.

👉 आवळा : 

केस पांढरे होणे थांबवण्यासाठी आवळा मदत करतो. यामुळेच तेल आणि शाम्पूमध्येही आवळ्याचा वापर केला जातो. नारळाच्या तेलामध्ये आवळ्याचे तुकडे टाका, या तुकड्यांना काळा रंग येईपर्यंत ते मिश्रण गरम करा आणि डोक्याला लावा. याबरोबरच आवळ्याचा रस पिला तरीही केस पांढरे होणे कमी होते.


👉 तिळाचे दाणे : 

तिळाचे दाणे बदामाच्या तेलात टाकून हे मिश्रण डोक्याला लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा, यामुळे तुमचे केस पांढरे व्हायचे प्रमाण कमी होईल.


👉 कांदा:

 गळणारे आणि पिकणारे केस थांबवण्यासाठी कांदा हा उपाय आहे. कांद्यामध्ये कॅटालेस एंजाईम मोठ्या प्रमाणावर असते. केस पांढरे होत असतील तर अर्धा कांदा घेऊन तो डोक्यावर चोळा किंवा कांद्याचा रस डोक्याला लावा आणि एका तासानंतर शाम्पूने केस धुवा.


👉 मेहंदी : 

केस पांढरे होणं थांबवण्यासाठी डोक्याला मेहंदी लावा. मेहंदी लावताना बनवण्यात येणाऱ्या मिश्रणामध्ये एरंडाचे तेल आणि लिंबाचा रस टाका आणि एक तासापर्यंत हे मिश्रण तसेच ठेवून मग ते डोक्याला लावा.

आवडल्यास नक्की share👍 करा व आमच्या fb पजेला पण जरूर like 😊 करा

बुधवार, 13 दिसंबर 2017

👉 कोल्हापूर येथे शासकीय रोजगार मेळावा

👉 कोल्हापूर येथे शासकीय रोजगार मेळावा





पोस्ट : अकाउंटंट - जागा : 05

पोस्ट : ITI (फिटर/टर्नर) - जागा : 20

पोस्ट : ITI (मशीनिस्ट) - जागा : 10

पोस्ट : CNC /VMC - जागा : 30

पोस्ट : हेल्पर्स - जागा : 15

पोस्ट : बॅक ऑफिस - जागा : 35

पोस्ट : हेल्पर/ऑपरेटर - जागा : 20

पोस्ट : सेल्स एक्झिक्युटिव - जागा : 35

पोस्ट : ITI इलेक्ट्रिशियन/फिटर - जागा : 15

पोस्ट : सेल्स एक्झिक्युटिव - जागा : 05

पोस्ट : सपोर्ट एक्झिक्युटिव - जागा : 03

पोस्ट : सपोर्ट एक्झिक्युटिव - जागा : 03

पोस्ट : मार्केटिंग एक्झिक्युटिव - जागा : 04

पोस्ट : प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर टेलिकॉलर - जागा : 10

पोस्ट : बिज़नेस डेवलपमेंट - जागा : 05

पोस्ट : मार्केटिंग मॅनेजर / एक्झिक्युटिव - जागा : 25

पोस्ट : ITI CNC /VMC - जागा : 05

पोस्ट : सेल्स ऑफिसर - जागा : 40

पोस्ट : सीनिअर अकाउंटंट - जागा : 02

पोस्ट : मार्केटिंग ऑफिसर - जागा : 03

पोस्ट : सुपरवायजर - जागा : 03

पोस्ट : टेलिकॉलर - जागा : 05

पोस्ट : फिल्ड ऑफिसर - जागा : 02

पोस्ट : ऑफिसबॉय - जागा : 01

पोस्ट : प्रमोटर - जागा : 01

पोस्ट : ITI Modular/Pouring Opr. - जागा : 06

पोस्ट : ITI Furness Opr /स्प्रे पेंटर - जागा : 07

पोस्ट : ITI वेल्डर & प्लंबर - जागा : 02

पोस्ट : सफाई कामगार - जागा : 02

नोकरी ठिकाण : कोल्हापूर

मेळाव्याची तारीख : दि. 17 डिसेंबर 2017

मेळाव्याचे ठिकाण : मेन राजाराम हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय जुना राजवाडा, कोल्हापूर

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/n1fu4Q

ऑनलाईन नोंदणीसाठी : https://goo.gl/WhnVEo


मंगलवार, 12 दिसंबर 2017

👉 फेसबुकचे नवीन ‘ग्रीटिंग्ज फिचर’

👉 फेसबुकचे नवीन ‘ग्रीटिंग्ज फिचर’





फेसबुकवर लवकरच नवीन फिचर येणार असून ‘ग्रीटिंग्ज फिचर’असे या नव्या फिचरचे नाव आहे. फेसबुकच्या या ग्रीटिंग फिचरद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेगळ्या पद्धतीने चॅट करू शकणार आहात. या नवीन फिचरमधून तुम्ही पोक, विंक किंवा हाय-फाय हेही पर्याय उपलब्ध होणार आहेत. सध्या या फिचरची चाचणी ब्रिटन, थायलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया आणि फ्रान्स येथे सुरू असून लवकरच ते जगभरात लाँच होणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

👉 तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?

👉 तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?




                बँक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड वापरले जात असल्याने त्याची खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच तुमचे आधार कार्ड कुठे वापरले तर जात नाही ना, याची पडताळणी करणे महत्वाचे ठरते. आता uidai ने हि सुविधा आधारधारकांना दिली असून वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधारचा वापर कुठे होतोय हे चेक करू शकता.


1) सर्वात आधी https://resident.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

2) या संकेतस्थळावर Aadhaar Authentication History वर क्लिक करा.

3) यानंतर OTP जनरेट करा, तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP नंबर येईल.

4) OTP नंबर टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळतील. त्यानंतर निश्चित वेळेत तुम्हला तो टाकावा लागेल.

5) तुमच्या आधार नंबरच्या डिटेल्सवरून तो कधी कधी वापरला गेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये जर काही गडबड असेल तर तुम्ही तक्रार करू शकता.

6) जर खरच तुमच्या आधारचा गैरवापर होत असेल तर तुम्ही आधार ऑनलाइन लॉक करू शकता.