लिंबूपाण्याचे असेही फायदे व घरगुती उपाय!
लिंबू हे फळ नेहमी आपल्या स्वयंपाक घरात सर्रास वापरले जाते. आता उन्हाळा हळू हळू वाढत असताना लिंबू पाणी सेवन करणे फायद्याचे ठरते. लिंबू पाणी आपल्या शरीरात ऊर्जा प्रदान करते त्यामुळे ते नेहमीच उपयोगी ठरते असेच काही घरगुती उपाय व फायदे आपण आता जाणून घेऊया.
१)वजन कमी करणे.
जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही हा सोप्पा घरगुती उपाय करून पहा. उपाय असा आहे की रोज सकाळी कोमट पाण्यामधील लिंबू सरबत सेवन करा त्यासाठी कोमट पाण्याच्या एका ग्लास मध्ये लिंबाचा रस घालून ते किमान २ वेळा सेवन करावे. प्रत्येक तासाला एक एक ग्लास पाणी प्या यामुळे भूक कमी लागेल आणि शरीराचे संतुलन राखले जाते. ह्या क्रियेमुळे पचन तंत्र सुधारते.
२) पोटाचे विकार दूर होतात.
जर तुम्हाला काही पोटाचे विकार असतील तर हे नक्की करून पहा. रोज लिंबू पाण्याचे सेवन केल्याने पचन क्रिया सुधारते व पोटाचे विकार दूर होतात. पचन क्रिये बरोबरच ऍसिडिटी चा त्रासही होत नाही त्यामुळे पोट खराब असलंयास लिंबूसरबत फायद्याचे ठरते.
३) किडनी स्टोन च्या आजारावर फायदेशीर.
रोज लिंबूसरबत घेतल्याने आरोग्य सुधारते त्याचबरोबर मुतखडा होणे हे विकार हि दूर होतात.लिंबूसरबतामुळे शरीर हायट्रेड होण्यास मदत होते. त्यामुळे युरिन ब्लॉक होणे हा त्रास कमी होतो .
४)मधुमेहावर गुणकारी.
साखरेचे प्रमाण असलेले पेय याचे सेवन करण्यापेक्षा लिंबू सरबतचे सेवन करणे कधीही फायद्याचे. लिंबूसरबतामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहते. शरीर हायट्रेड राहते व शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.
तर हे होते लिंबूपाणी पिण्याचे फायदे व घरगुती उपाय. लेख आवडल्यास नक्की share करा व हि माहिती आपल्या प्रियजनांना सांगा.
Very nice
जवाब देंहटाएंचांगली माहिती
जवाब देंहटाएं